भाजपचा स्वीकृत नगरसेवक पक्षातून बडतर्फ; पक्षविरोधी कारवायांचा ठपका, शहराध्यक्षांनी केली कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव नगर परिषदेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक असलेले संदीप वर्मा यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आज, १८ ऑक्टोबर रोजी भाजपचे शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांनी वर्मा यांना बडतर्फ केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार आकाश फुंडकर यांच्या होमग्राऊंडवर …
 
भाजपचा स्वीकृत नगरसेवक पक्षातून बडतर्फ; पक्षविरोधी कारवायांचा ठपका, शहराध्यक्षांनी केली कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव नगर परिषदेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक असलेले संदीप वर्मा यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्‍यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आज, १८ ऑक्टोबर रोजी भाजपचे शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांनी वर्मा यांना बडतर्फ केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार आकाश फुंडकर यांच्या होमग्राऊंडवर भाजपमध्ये सध्या अंतर्गत कलहाचे चित्र आहे. स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा हे पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत कार्य करतात. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे. यापुढे वर्मा यांनी कोणत्याही कारणांसाठी पक्षाचा नावाचा वापर करू नये. त्यांनी कुठल्याही वैध किंवा अवैध कामासाठी भाजपच्या नावाच्या वापर केल्यास पक्षाकडून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा भाजप शहराध्यक्षांनी दिला आहे.