भडव्या, चंप्या म्हणत भाजपा नेत्यांचा आमदार संजय गायकवाडांकडून उद्धार!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे राज्यासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना भाजपच्या नेत्यांना केवळ सरकार पाडायचे सूचते, अशी टीका करत आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या शब्दांत भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे. भडव्या, चंप्या अशा शब्दांत त्यांनी भाजपा नेत्यांचा उद्धार केला. बुलडाणा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते प्रचंड खवळल्याचे दिसून आले.
कोरोना हा आजार पक्ष पाहून होत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. भाजपच्या 105 आमदारांना आणि 20 खासदारांना महाराष्ट्रातील जनतेनेच निवडून दिले आहे. मात्र लस आणि रेमडीसीविर महाराष्ट्राला देऊ नका असे केंद्राकडून कंपन्यांना सांगितले जात असल्याचा आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला. केंद्राकडे ऑक्सिजन मागितला तरी केंद्र राज्याला ऑक्सिजन देत नाही. 50000 इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरातमध्ये फुकट वाटले जातात. इकडे महाराष्ट्रात लोक तडफडत आहेत. अशा प्रकारचे नीच राजकारण राज्यात, देशामध्येच काय तर जगातही कोणत्या पक्षाने केले नाही, असा घणाघात त्यांनी केला.
पहा व्हिडिओत काय म्हणाले गायकवाड…