बुलडाण्यात आ. संजय गायकवाड आक्रमक!; भाजपा नेत्यांना केला हा प्रश्न!; ‘बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लखमीपूर येथील हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बुलडाणा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेसह जयस्तंभ चौक, चिंचोले चौक, कारंजा चौक, चिखली रोड, इकबाल चौक, धाड रोड, सर्क्यूलर रोड, मलकापूर रोडवरील दुकाने सकाळपासून दुपारपर्यंत बंद होती. दुपारनंतर अनेक दुकाने उघडली. आधीच कोरोनामुळे डबघाईस आलेल्या …
 
बुलडाण्यात आ. संजय गायकवाड आक्रमक!; भाजपा नेत्यांना केला हा प्रश्न!; ‘बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लखमीपूर येथील हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बुलडाणा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेसह जयस्तंभ चौक, चिंचोले चौक, कारंजा चौक, चिखली रोड, इकबाल चौक, धाड रोड, सर्क्यूलर रोड, मलकापूर रोडवरील दुकाने सकाळपासून दुपारपर्यंत बंद होती. दुपारनंतर अनेक दुकाने उघडली. आधीच कोरोनामुळे डबघाईस आलेल्या व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा म्‍हणून या बंदमध्ये सहभाग घेतल्याचे दिसून आले.

राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने हा बंद पुकारला होता. बंद यशस्वी करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात आघाडीचे नेते जयस्तंभ चौकात एकवटले. मोटारसायकल रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुन्‍हा जयस्तंभ चौकात एकत्र येऊन केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले, की केंद्रातील भाजप सरकार हे मोगलांच्या पेक्षाही वाईट पद्धतीने देशातील जनतेशी वागत आहे.

बुलडाण्यात आ. संजय गायकवाड आक्रमक!; भाजपा नेत्यांना केला हा प्रश्न!; ‘बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद

कृषी कायदे रद्द करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना चिरडले जाते. आतापर्यंत ३००-४०० आंदोलक शेतकऱ्यांनी जीव गमावला मात्र तरीही केंद्र सरकारला शेतकऱ्यांची दयामाया नाही. केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात ईडी लावल्या जातात. ईडी, आयकर विभाग, सीबीआय या सर्व संस्था केंद्र सरकारचे गुलाम म्हणून काम करतात. भाजपचे लोक काय राजा हरिश्चंद्राची औलाद आहे का, असेही आमदार गायकवाड म्हणाले. केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या या बंदला शहरातील व्यापारी, लघुव्यावसायिक यांनी स्वतःहून पाठिंबा दिल्याचा दावा आमदार गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी शिवसेनेचे जालिंधर बुधवत, मुन्ना बेंडवाल, कुणाल गायकवाड, राष्ट्रवादीचे नरेश शेळके, ॲड. सुमित सरदार, जि.प. सदस्य दत्तात्रय लहाने, काँग्रेसचे शैलेश खेडेकर, सतिश मेहेंद्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला. त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप आहे. मात्र केंद्रीय गृहराज्‍यमंत्र्यांनी हा आरोप फेटाळला असून, आपला मुलगा आपल्या सोबतच होता, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.