बुलडाणा नगरपालिकेतील काँग्रेस गटनेते शिवसेनेत;मेहकरात खासदारांनी बांधले शिवबंधन

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आणि गट नेते आकाश दळवी यांनी आज, 20 जुलैला आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश केला. खासदार प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला. आकाश दळवी विद्यार्थी दशेपासूनच एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. चैतन्यवाडी प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरपरिषदेत काँग्रेस गटनेते म्हणूनही त्यांच्याकडे …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आणि गट नेते आकाश दळवी यांनी आज, 20 जुलैला आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश केला. खासदार प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला.

आकाश दळवी विद्यार्थी दशेपासूनच एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. चैतन्यवाडी प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरपरिषदेत काँग्रेस गटनेते म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मित्रपक्ष असोत कीअन्य कोणत्याही पक्षांचे नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत दाखल करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज काँग्रेसचे गटनेते आकाश दळवी यांना आपल्या तंबूत खेचण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज सकाळी खासदार प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आकाश दळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार संजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, श्रीकांत गायकवाड, नगरसेवक मोहन पर्‍हाड, माजी नगरसेवक गोविंदा खुमकर उपस्थित होते.