प्रदीप जी गुस्सा क्यो आता है…; शेतकरी आंदोलनाबाबत विचारताच भडकले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या भरभक्कम पायाभरणी व कोरोना संकटामुळे मरगळलेल्या उद्योग जगताला उभारी देतानाच सर्व समाज घटकांना न्याय देणारा योजनाबद्ध दस्तावेज असल्याचे आग्रही प्रतिपादन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशोकार यांनी येथे केले. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या भरभक्कम पायाभरणी व कोरोना संकटामुळे मरगळलेल्या उद्योग जगताला उभारी देतानाच सर्व समाज घटकांना न्याय देणारा योजनाबद्ध दस्तावेज असल्याचे आग्रही प्रतिपादन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशोकार यांनी येथे केले. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद असल्याचा दावाही त्यांनी केला.
जिल्हा पत्रकार संघ भवनात आज, 18 फेब्रुवारीला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, शहर अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , रघुनाथ खरडे, प्रभाकर वारे, आशिष व्यवहारे हजर होते. यावेळी बोलताना श्री. पेशकार यांनी बजेटमधील ठळक तरतुदी व वैशिष्ट्ये विशद केलीत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात आरोग्य सेवा व कोरोना लसीकरण यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रथम व सहज पर्याय हा करवाढीचा असताना केंद्र सरकारने हा पर्याय स्वीकारला नाही. त्यावेळी उद्योग व पायाभूत सुविधांसाठी 7 लाख 54 हजार कोटी रुपयांची तरतूद करून अप्रत्यक्ष कर मिळण्याचे प्रवधान करण्यात आले आहे. तसेच गरीब कल्याण व महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला. पीएम आवास, शौचालय, उज्‍ज्‍वला गॅस, जनधन खाते, पीएम कल्याण योजना, बँकेत थेट अनुदान आदी योजनांची उपयुक्तता कोरोना संकटात दिसून आली, असे पेशकार यावेळी म्हणाले. कृषी, शिक्षण व शिष्यवृत्ती, संशोधन, संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविणे, स्टार्ट अप आदीवर भर देण्यात आल्याचे ते म्हणाले.
प्रदीप जी गुस्सा क्यो आता है…
दरम्यान अर्थसंकल्पावर शांतपणे बोलणारे प्रदीप पेशकार कृषी विधेयक व दिल्लीतील आंदोलन यावर छेडले असता काहीसे भडकल्याचे दिसून आले. या आंदोलनाचा हेतू काय हा संशोधनाचा विषय आहे. यावर कळस म्हणजे आंदोलकाना पंतप्रधानांऐवजी टीवटीवाट करणारे विदेशीचे जवळचे वाटतात हा दुर्दैवाचा कळस आहे. गणराज्य दिनाला गालबोट लागूनही सरकारने अत्यंत संयमाने सर्व काही हाताळले, असे त्यांनी सांगितले.

एमआयडीसी म्हणजे मनमानीचा कळस: आ, फुंडकर
दरम्यान खामगाव व चिखली येथील कथित टेक्सटाईल पार्क कागदोपत्रीच असल्याचे विचारले असता आमदार फुंडकर यांनी एमआयडीसीच्या कारभारावर व मनमानी कार्य पद्धतीवर खरपूस टीका केली. यासाठी व खामगाव वसाहतीच्या विस्‍ताराबद्दल पाठपुरावा करण्यात आपली पहिली टर्म संपली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता कुठे विस्तारास मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.