परवानगी नसताना भाजपा ओबीसी मोर्चाची निदर्शने, कोरोना नियमांचाही भंग, गुन्‍हे दाखल होणार

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण टिकवून ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाने आज, 3 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी नसताना निदर्शने केली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांविरुद्ध कारवाईचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिले …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण टिकवून ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षाच्‍या ओबीसी मोर्चाने आज, 3 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी नसताना निदर्शने केली. त्‍यामुळे आंदोलनकर्त्यांविरुद्ध कारवाईचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिले आहेत.

आंदोलनाचे नेतृत्त्व ओबीसी मोर्चाच्‍या प्रदेश सचिव शालिनीताई बुंधे, जिल्हाध्यक्ष रवींद्र ढोकणे, जिल्हा सरचिटणीस गोडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधूताई खेडेकर आदींनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्‍यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली.

सौ. शालिनीताई बुंधे यांचे सरकारवर टीकास्‍त्र.

निवेदनात म्‍हटले आहे, की 12 डिसेंबरला सर्वोच्‍च न्‍यायालयाने राज्‍य सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात काही आदेश दिले होते. त्‍या आदेशांची पूर्तता सरकारने केलीच नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाने 10-12 तारखा देऊनही राज्‍य सरकारने हलगर्जीपणा केला. त्‍यामुळे सर्वोच्‍च न्‍यायालयाने आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका फेटाळली. लवकरात लवकर यावर कार्यवाही झाली नाही तर ओबीसी समाज रस्‍त्‍यावर उतरेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याने कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला. शिवाय आंदोलनाला परवानगीही पोलीस विभागाने दिली नव्‍हती. त्‍यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्‍हे दाखल करण्यात आदेश दिले आहेत.