नांद्रा कोळीला स्मार्ट व्हिलेज करण्याचे स्वप्न… अनेक योजना मार्गी लावल्या, पुढच्या पाच वर्षांत आणखी योजना आणून गावात आणणार विकासगंगा!; निर्धार जनविकास पॅनलचा!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावातील समस्यांवर आजवर प्रभावीपणे मात करण्याचा प्रयत्न केला. बहुतांश समस्या सुटल्या आहेत, काही योजना गावात आणल्या आहेत. त्या योजनांना दुसर्या टर्ममध्ये मार्गी लावणार आहे. ही दुसरी टर्म ग्रामस्थ देतील अशी आशा आहे. गावाचं राजकारण आणि विकासकामांचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागली. पण आता ते जमलं आहे. पुढच्या 5 वर्षांत नांद्रा कोळी स्मार्ट व्हिलेज करणार असून, यासाठी हिवरेबाजार, पाटोदा या गावांचा आदर्श ठेवला आहे. त्या धर्तीवर नांद्रा कोळीत विकासगंगा आणणार आहे. सरकारही आमचेच असल्याने गावात विकास योजना आणताना अडचणी येणार नाहीत. लोकप्रतिनिधींचा फुल सपार्ट असल्याचा विश्वास सत्ताधारी पॅनल असलेल्या जनविकास पॅनलचे प्रमुख संजय चतरू काळवाघे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केला.
11 सदस्य असलेल्या नांद्राकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीत जनविकास पॅनलची हवा असून, संजय काळवाघे यांची विकासाची दूरदृष्टी आणि गावात झालेली विकासकामे यामुळे ग्रामस्थांना त्यांचाच विश्वास वाटतो. कोणत्याही क्षणी मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती, समाजासाठी कायपण अशी भावना यामुळे ग्रामस्थांना ते प्रिय आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही विकास करू असा आव आणला तरी ग्रामस्थांना विश्वास बसण्याची शाश्वती नाही. गावात आणलेल्या विकासाच्या योजना पुढच्या पाच वर्षांत पूर्ण करून गाव स्मार्ट व्हिलेज करण्याकडे श्री. काळवाघे यांची वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितल्याने गावकर्यांना विकास जर कुणी करेल तर ते जनविकास पॅनल हा विश्वास वाटत आहे. त्यामुळेच प्रचाराही या पॅनलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे आहेत विकास करणारे हात…
- नांद्रा कोळीची लोकसंख्या 4,634 असून, या निवडणुकीत जनविकास पॅनलने आपले 10 उमेदवार उभे केले आहेत. ते उमेदवार असे ः
- वॉर्ड क्रमांक 1 मधील उमेदवार
- संजय चतुरू काळवाघे (निशाणी ः छत्री)
- सौ. निर्मला मोहन जाधव (निशाणी ः कपाट)
- सौ. पूजा अनिल खंडागळे (निशाणी ः बॅट)
- वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवार
- राजेश श्रीकृष्ण काळवाघे (निशाणी ः बॅट)
- सौ. शिला गजानन घुबे (निशाणी ः छत्री)
- सौ. आशाबाई संजय काळवाघे (ट्रॅक्टर)
- वॉर्ड क्रमांक 3 मधील उमेदवार
- रवींद्र सहादू हिवाळे (निशाणी ः बॅट)
- वॉर्ड क्रमांक 4 मधील उमेदवार
- सौ. मीना संजय संपतराव काळवाघे (निशाणी ः छत्री)
- श्रीमती कांताबाई राजेंद्र हिवाळे (निशाणी ः पंखा)
- फकिरा हैदर शाह (निशाणी ः एसटी बस)
जनविकास पॅनलचा भर ग्रामस्थांना मुलभूत सुविधा देण्यावर
जनविकास पॅनलचे प्रमुख संजय चतरू काळवाघे उच्चशिक्षित असून, बी.पी.ई. (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) असे त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांना सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड होती. ही आवड त्यांना राजकारणात येण्यास कारणीभूत ठरली. लोकांची कामे करायची असतील तर सत्ता महत्त्वाची असते हे त्यांना कळून चुकल्याने त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला आणि लोकांच्या प्रेमामुळे ते निवडूनही आले. मात्र त्यांचा आयुष्यपट मोठा संघर्षमय असा आहे. 1995 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरी अवघी 3 एकर शेती. ही शेती करून ते मजुरी करायचे. त्यांचा लहान भाऊ पीओपीच्या कामात निपुन आहे. समाजकारण सुरू केल्यानंतर मी आणि माझ्या मित्रांनी प्रत्येकी 100 रुपये जमा करून व्यायामशाळेसाठी जागा विकत घेतली होती. तिथूनच आपण काहीतरी गावासाठी करू शकतो, असा विश्वास निर्माण झाला, असे श्री. काळवाघे सांगतात.
पुढच्या 5 वर्षांत काय करणार…
व्यायामशाळेत साहित्य आणायचे आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून गावातील स्मशानभूमीचा विकास करायचा आहे. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी घंटागाडी सुरू करणार आहे. नियमित गाव स्वच्छ राहण्यावर भर देणार आहे. मराठी शाळा बंद पडू देणार नाही. अंगणवाडीचे काम करायचे आहे. वॉर्ड क्रमांक 1 मधील रस्त्याच्या कामांसह गावाला लागून जे शेतरस्ते आहेत त्यांचीही कामे करायची आहेत. वृध्द व बालकांसाठी बसायला आणि रम्य वातावरण निर्माण करून खंडोबांचे मंदिर बांधणे आहे. गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागा मिळवायची आहे. हनुमान मंदिरासमोरील नाल्याला संरक्षण भिंत बांधणे आहे. गावात वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सभामंडप करणे आहे. सध्याची ग्रामपंचायत करमणूक केंद्रात भरते. 25 वर्षांपासून तिला लागून असलेली जुनी मोडकळीस आलेली ग्रामपंचायत नव्याने बांधायची आहे. गावातील सार्वजनिक विहिरीला झाकण लावणे आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याला संरक्षण भिंत बांधायची आहे. ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आरओ प्लांट ग्रामपंचायतीत बसवणार आहे. गावामधील पिरबाबा संस्थानला सभामंडप करणे आहे.
विकासाचा मार्ग मोकळा…
आमदार, खासदार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडे गावातील समस्या मांडून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांनीही चांगला प्रतिसाद वेळोवळी दिला आहे. राज्यात सत्ता शिवसेनेची असल्याने गावात विविध योजना येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य, खासदार, पालकमंत्री, आमदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषद विभागात येणारे बांधकाम समिती, आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण, कृषी सभापती, बीडीओ, तहसीलदार, एचडीओ, झेडपी सीओ यांच्या माध्यमातून गावात विविध विकासाच्या योजना मार्गी लावणार आहे.
आजवर केलेली विकासकामे…
दलित वस्ती अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद मराठी शाळा दुरुस्ती व कलरिंग, वालकंपाऊंड, अर्धवट झालेली अंगणवाडी केली. मुख्य गाव परिसरातील रस्त्यांची कामे केली. गावात व्यायामशाळा बांधली. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पेव्हरब्लॉक शाळेच्या आवारात बसवले. शेतरस्ता माती काम केले. कृषीविभागाच्या पोखरा योजना अंतर्गत शेतकर्यांना वैयक्तिक लाभाचे 54 ते 55 लाखांपर्यंत अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. कृषीविज्ञान केंद्राव्दारे शेतकर्यांना वारंवार मार्गदर्शन मिळण्यासाठी पुढाकार घेतला. शेतकर्यांच्या झालेल्या सोयाबीन नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी पुढाकार घेतला… अशी एक ना अनेक विकासकामे सांगताना श्री. काळवाघे यांची यादी वाढतच होती…
सकारात्मक दृष्टी ठेवल्यास सारे काही शक्य…
आपण सकारात्मक असलो की आपोआप सर्वांचे सहकार्य मिळते. आजवर विकासकामांत अधिकार्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. आमचे जनविकास पॅनल हे महाविकास आघाडीशी संबंधित आहे. आमदारसाहेबांकडून वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन घेतो. सर्व पक्षांचे सहकार्य मिळत असल्याने विकासात फारशा अडचणी येत नाहीत. शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवंत साहेब, खासदार जाधव साहेब अशा लोकांचे चांगले मार्गदर्शन होते. आमदार साहेबांकडून पांदणरस्ताची कामे झाली. व्यायामशाळेसह बुधवंत साहेबांच्या माध्यमातून शाळेची कामे झाली. खासदार साहेबांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे झाली. जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून नांद्राकोळी ते कोलवड शेतरस्ता तयार झाला. आमदारसाहेब व शिंगणे साहेबांच्या माध्यमातून नांद्राकोळी जि. प. मराठी शाळा पासून ते हतेडीकडे जाणारा रस्ता मातीकाम आणि खडीकरण या कामाची वर्क ऑडर झाली आहे. जिल्हा परिषद सदस्यांकडून नांद्राकोळी- अजिसपूर रस्त्यापासून साखळी बुद्रूक जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण कामाची वर्क ऑडर झाली आहे, असेही श्री. काळवाघे यांनी सांगितले.
गाव स्मार्ट व्हिलेज करणार…
गावात वीज, पाणी, चांगले रस्ते या मुलभूत सुविधा कुठेही कमी पडणार नाहीत, यावर माझा भर असतो. त्यानंतर अन्य सोयीसुविधा पुरवून गाव स्मार्ट व्हिलेज करणार आहे. पाटोदा, हिवरेबाजार या गावांचा आदर्श घेणार असून, तिथे भेट देऊन विकासकामे कशा पद्धतीने केली आहेत, याचाही आढावा घ्यायला जाणार आहे. शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन व सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणार असल्याचेही श्री. काळवाघे यांनी सांगितले. गावात विकासाची कामे करायची म्हटल्यावर कधी कधी विरोध होतो. पण सकारात्मक मुद्दे मांडून त्यांचीही मने वळवतो, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थ म्हणतात…
जनविकास पॅनलचे दहावी उमेदवार चांगले, निर्मळ मनाचे व गावाचा विकास करणारे आहेत. आजपर्यंत सर्व कामे चांगली केली आहेत. त्यांनी गावाचा विकास केला. अगदी थोड्या दिवसांत गावाच्या सर्व लोकांकडे लक्ष घालून अगदी योग्य काम केले आहे.
– सखाराम रामभाऊ काळवाघे
जनविकास पॅनलमध्ये तरुण मंडळी आहे. होतकरू आहेत. त्यामुळे ते नक्कीच गावाचा विकास करत आले आहेत आणि यापुढेही करतील. बरीच कामे त्यांनी केली. त्यांचा विजय नक्कीच होणार.
– संजय नारायण काळवाघे (महाराज)
जनविकास पॅनल चांगले कामे करतात. कोरोना काळात खूप चांगली कामे त्यांनी केली. तांदूळ वाटप केले. 15 महिन्यांच्या आत शासकीय योजना आणल्या. त्यामुळे गावात विकासकामे घडली आणि घडत आहेत.
– भिका मधुकर गुरव
जनविकास पॅनलच्या कार्यकाळात खूप चांगले कामे झाले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्कची गरज या गावात त्यांनी सुरू केली. चांगल्या कामाच्या सूचना दिल्या. त्यामुळे जनविकास पॅनल हाच योग्य निर्णय.
– दिलीप सुदाम जाधव
महिला सन्मानासाठी पुढाकार
महिलांच्या विकासासाठीही जनविकास पॅनलचा भर राहिला आहे. महिला बचतगटाची स्थापना करून पंचायत समिती अंतर्गत 60 ते 70 गट कार्यरत आहेत. यापुढच्या काळात सार्वजनिक ठिकाणी संडास- बाथरूम महिलांसाठी तयार करणार आहे. गावात सर्व महापुरूषांच्या जयंती साजर्या होतात. ग्रामपंचायत माध्यमातून सर्वाजनिक स्वरूपात जयंती, उत्सव साजरा करून गावातील एकोपा टिकवून ठेवण्याच्या बाबतीत श्री. काळवाघे दक्ष असतात.