नांदुरा पंचायत समिती उपसभापतीपदी सौ. योगीताबाई गावंडे

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सौ. योगीताबाई संदीप गावंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज, 17 मार्चला पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली.सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. सुनिताताई संतोष डिवरे विराजमान आहेत. सदस्यांच्या आपसात झालेल्या निर्णयामुळे शिवसेनेचे गजानन गव्हाळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त …
 

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा पंचायत समितीच्‍या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सौ. योगीताबाई संदीप गावंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज, 17 मार्चला पंचायत समितीच्‍या सभागृहात ही निवडणूक झाली.
सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. सुनिताताई संतोष डिवरे विराजमान आहेत. सदस्यांच्या आपसात झालेल्या निर्णयामुळे शिवसेनेचे गजानन गव्हाळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पंचायत समितीच्या सभागृहात सदस्यांची बैठक घेऊन पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल तायडे यांनी काम पाहिले. यावेळी सभापती सौ. डिवरे, अर्चनाताई पाटील, गजानन गव्हाळे, प्रभाकर वानखडे उपस्थित होते. नवनियुक्त उपसभापती सौ. योगिताबाई गावंडे यांचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी स्वागत केले.