देऊळगाव राजात सायकल रॅली काढून महागाईचा विरोध!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वाढत्या महागाईच्या विरोधात आज, १९ जुलैला काँग्रेसतर्फे देऊळगाव राजा शहरात सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्त्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांनी केले. पेटोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल, औषधी, बी बियाणे व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. गीतांजली टॉकीजपासून रॅलीची …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वाढत्या महागाईच्या विरोधात आज, १९ जुलैला काँग्रेसतर्फे देऊळगाव राजा शहरात सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्त्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांनी केले.

पेटोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल, औषधी, बी बियाणे व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. गीतांजली टॉकीजपासून रॅलीची सुरुवात झाली. चौंडेश्वरी मंदिर, अहिंसा मार्ग, महात्‍म फुले रोड, जुना जालना रोड, मदिना मार्केट ते बसस्थानक चौकापर्यंत येऊन रॅलीचे विसर्जन झाले. यावेळी केंद्र सरकारच्‍या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीत जिल्हा सचिव रमेश कायंदे, सुभाष दराडे, तालुकाध्यक्ष दिलीप सानप, नगसेवक इस्माइल बागवान, भीमरत्न सतिष, मिर्चीवाले सिद्दीक सेठ, राजू बोराडे, हनिफ शहा, रफीक सेठ,अातिष कासारे, गजानन काकड, याकूब खान, नदीम भाई, दीपक तिडके, सचिन मुंढे, वसीम खान, गजानन लंके, दिलीप कोल्हे, सादिक इंजिनीअर, रुस्तुम भुतेकर, शेख सय्यद अादी सहभागी झाले होते.देऊळगाव राजात सायकल रॅली काढून महागाईचा विरोध!