देऊळगाव राजाच्या ग्रामीण भागात प्रचाराला चढलाय जोर…
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव राजा तालुक्यातील २६ पैकी २३ ग्रामपंचायतींच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचाराला अवघे चार दिवस बाकी आहेत. उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटून तसेच बाहेरगावी असणाऱ्या मतदाराना फोनवरुन संपर्क साधताना दिसत आहेत.मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फंडे अवलंबले जात आहेत. सध्या शहरातील हॉटेल, बार धाब्यांवर मोठ्या …
Jan 10, 2021, 19:03 IST
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव राजा तालुक्यातील २६ पैकी २३ ग्रामपंचायतींच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचाराला अवघे चार दिवस बाकी आहेत. उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटून तसेच बाहेरगावी असणाऱ्या मतदाराना फोनवरुन संपर्क साधताना दिसत आहेत.मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फंडे अवलंबले जात आहेत. सध्या शहरातील हॉटेल, बार धाब्यांवर मोठ्या प्रमाणार गर्दी पहावयास मिळत आहे. मतदारांना खुश करण्यासाठी धाब्यावर जेऊ घालणे, दारू पाजणे, चहा- नाष्टा करवला जात आहे. १४ तारखेला मकरसंक्रांत असलेल्याने जवळपास सर्वच पॅनल्सनी हळदी कुंकवाच्या (वाण) कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. यामधून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत.