देऊळगाव राजा पंचायत समिती सभापतिपदी हरिभाऊ शेटे बिनविरोध

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापतिपदी आज, २६ जुलैला हरिभाऊ शेटे यांची बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण सहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीचे सभापतिपद महिनाभरापासून रिक्त होते. माजी सभापती सौ. रेणुकाताई बुरुकूल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. चार सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर एक …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापतिपदी आज, २६ जुलैला हरिभाऊ शेटे यांची बिनविरोध निवडून आले आहेत.

एकूण सहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीचे सभापतिपद महिनाभरापासून रिक्त होते. माजी सभापती सौ. रेणुकाताई बुरुकूल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. चार सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर एक भाजपाचा व एक शिवसेनेचा असे पंचायत समितीत पक्षीय बलाबल आहेत. त्यामुळे राष्टवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. सभापती पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे निवडणूक निर्णयक अधिकारी तथा तहसीलदार सारिका भगत यांनी त्‍यांना विजयी घोषित केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. रेणुकाताई बुरुकूल, सौ. कल्याणी शिंगणे, सौ. शारदा सानप, भगवान खंदारे यांची तर एक सदस्य अनुपस्थित होता. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव, तालुकाध्यक्ष राजू शिरसाट, गणेश सवडे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, गणेश बुरुकूल, युवा नेते आकाश जाधव, अरविंद खांडेभराड अादी उपस्थित होते.