देऊळगाव राजा चारही नगरपरिषदेत सभापतीपदे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे!
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा नगरपरिषदेत भाजप नगरसेवकांनी संख्या जास्त असूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चार सभापतीपदे आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे.
बांधकाम सभापती म्हणून शेख सेमील शेख बागबान, आरोग्य सभापतीपदी रंजना बाळूभाऊ शिंगणे, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी विद्याताई कासारे यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षण सभापती विष्णू रामाणे यांची निवड झाली. सध्या भाजपचा नगराध्यक्ष असूनही आघाडीने चारही सभापतीपदांवर ताबा मिळवले आहेत. नगरपरिषद सभागृहात दुपारी तीनला विषय समित्यांच्या निवडणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी सभापती पदासाठी अर्ज भरण्यात आले. निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी सारिका भगत, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी पार पाडली. उपनगराध्यक्ष पवन झोरे, भाजप-शिवसेना सदस्य वगळता काँग्रेस-राष्ट्रवादी सर्व सदस्य हजर होते. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.