दानवेंच्या प्रतिमेला चिखलीत फासले काळे!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय सभेत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने चिखली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. काल, २३ ऑगस्टला दानवे यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी काळे फासले. आंदोलनात अध्यक्ष बाळू साळोक, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष समाधान आकाळ, संजय गिरी, शिवा म्हस्के, राहुल व्यवहारे, आकाश …
Aug 24, 2021, 15:02 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय सभेत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने चिखली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. काल, २३ ऑगस्टला दानवे यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी काळे फासले. आंदोलनात अध्यक्ष बाळू साळोक, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष समाधान आकाळ, संजय गिरी, शिवा म्हस्के, राहुल व्यवहारे, आकाश साळवे, समाधान गायकवाड, विशाल गायकवाड, गोपाल गायकवाड, विजय गायकवाड, रामदास गायकवाड आदींनी घोषणाबाजी केली.