‘तिला’ पावली ग्रामपंचायत निवडणूक! ‘त्या’ कामासाठी 47 लाख मिळवले!; 25 लाख घेतले होते अ‍ॅडव्हान्स!

बुलडाणा (संजय मोहिते) ः हेडिंग वाचून वाचक बुचकळ्यात पडला असाल. पण हे सत्य आहे. नुकतेच पार पडलेली ग्रामपंचायतीची निवडणूक किती जणांना पावली हा संशोधनाचा विषय असला तरी, लालपरीला म्हणजेच एसटी महामंडळाला मात्र भरभरून पावली आहे.अगोदरच प्रचंड तोट्यात असलेल्या व कोरोनामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या लालपरीला 15 जानेवारी 2021 रोजी पार पडलेली 527 ग्रामपंचायतीची निवडणूक लाभदायक ठरली. …
 

बुलडाणा (संजय मोहिते) ः हेडिंग वाचून वाचक बुचकळ्यात पडला असाल. पण हे सत्य आहे. नुकतेच पार पडलेली ग्रामपंचायतीची निवडणूक किती जणांना पावली हा संशोधनाचा विषय असला तरी, लालपरीला म्हणजेच एसटी महामंडळाला मात्र भरभरून पावली आहे.
अगोदरच प्रचंड तोट्यात असलेल्या व कोरोनामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या लालपरीला 15 जानेवारी 2021 रोजी पार पडलेली 527 ग्रामपंचायतीची निवडणूक लाभदायक ठरली. आता याचा हिशेब सांगायचा तर 15 जानेवारीला पार पडलेल्या मतदानासाठी बुलडाणा विभागाच्या तब्बल 402 बसगाड्या घेण्यात आल्या. यातून जिल्ह्यातील मतदान केंद्रापर्यंत मतदान कर्मचारी व साहित्याची ने आण करण्यात आली. यापोटी बुलडाणा एसटी विभागाला तब्बल 47 लाख, 63 हजार 700 रुपयांचे घशघशीत उत्पन्न मिळाले. कमालीचा हिशोबीपणा दाखविणार्‍या महामंडळाने यासाठी तब्बल 25 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेतले. उर्वरित 22 लाख 63 हजार 700 रुपयांचे बिल सादर करण्यात आले असून त्याचा धनादेश लवकरच मिळणार आहे. यामुळे महामंडळाला ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे मिनी जॅकपॉटच ठरला.