तामगावचे 21 मतदार संग्रामपूर शहरात कैसे आ गये रे बाबा…; मतदारयादीतील अनेक घोळ चव्‍हाट्यावर

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ) ः संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत घोळ असून, तो दुरुस्त करण्याची मागणी संग्रामपूर मित्र परिवाराने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मतदार याद्या अद्ययावत न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. मतदार ज्या प्रभागात राहत आहे त्या प्रभागातच त्याचे नाव न टाकता दुसऱ्याच प्रभागात आहे. अशी बरीचशी नावे आली आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ) ः संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या  मतदार यादीत घोळ असून, तो दुरुस्त करण्याची मागणी संग्रामपूर मित्र परिवाराने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मतदार याद्या अद्ययावत न केल्यास  लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

मतदार ज्या प्रभागात राहत आहे त्या प्रभागातच त्याचे नाव न टाकता दुसऱ्याच प्रभागात आहे. अशी बरीचशी नावे आली आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी प्रारूप यादी तयार करताना मतदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली त्यांच्‍यावर कारवाई करावी, असे मागणीही निवेदनात केली आहे. वॉर्ड क्र. 14 च्या प्रारूप यादीमध्ये पृष्ठ क्र. 17 वर संग्रामपूर शहराच्या लगतचे गाव तामगाव ग्रामपंचायतीमधील 21मतदारांची नावे संग्रामपूर शहरात रहिवासी नसताना देखील टाकण्यात आली आहेत. ही नावे वगळावीत, अशीही मागणी निवेदनात केली आहे.  निवेदनावर सारंगधर इंगळे, शाळीग्राम घाटे, अ. हमीद शेख मजीद, हरिभाऊ तायडे, शेख याकूब  यांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.