तहसीलसह पालिका इमारतीत होणार मेंबरचा फैसला! चिखलीत क्रीडा संकुल तर जळगाव जामोदमध्ये धान्य गोदामात ठरणार सदस्य!

गंमत ग्रामपंचायत निवडणुकीची… बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शीर्षक वाचून बुलडाणा लाइव्हचे वाचक बुचकळ्यात पडले असतील तर त्यात नवल नाहीच! याचे कारण 498 ग्रामपंचायतींचे सदस्य तर निवडणुकीतूनच ठरतार ना? त्यांच्या विजयाची घोषणा मतमोजणी अंतीच होणार आहे. त्यासाठी मोजणी केंद्र निश्चित झाले असून, त्यात तहसील कार्यालये, पालिका इमारत तर प्रत्येकी एका क्रीडा संकुल …
 

गंमत ग्रामपंचायत निवडणुकीची…

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शीर्षक वाचून बुलडाणा लाइव्हचे वाचक बुचकळ्यात पडले असतील तर त्यात नवल नाहीच! याचे कारण 498 ग्रामपंचायतींचे सदस्य तर निवडणुकीतूनच ठरतार ना? त्यांच्या विजयाची घोषणा मतमोजणी अंतीच होणार आहे. त्यासाठी मोजणी केंद्र निश्‍चित झाले असून, त्यात तहसील कार्यालये, पालिका इमारत तर प्रत्येकी एका क्रीडा संकुल व धान्य गोदामाचाही समावेश आहे. यामुळे मेंबर ठरणार तर या ठिकाणीच ना मंडळी?

बिनविरोधमुळे आता 3891 जागांसाठीच मतदान होणार आहे. यानंतर 18 जानेवारीला होणार्‍या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 वाजता सुरू होणार्‍या या मतमोजणीसाठी 13 केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत. यानुसार बुलडाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, मोताळा, मलकापूर, नांदुरा तहसीलची मतमोजणी तहसील कार्यालयातच पार पडणार आहे. चिखलीची तालुका क्रीडा संकुलात तर जळगाव जामोदची तेथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे. सिंदखेड राजाची नगरपालिका टाऊन हॉल, देऊळगाव राजाची जुन्या नगर पालिका टाऊन हॉलमध्ये, खामगावची लोकमान्य टिळक नगर पालिका शाळा क्रमांक 6, शेगाव तालुक्याची नगर पालिका शाळा क्रमांक 5 मध्ये मतमोजणी होईल. मतदानाबरोबरच या मतमोजणीची देखील जय्यत तयारी सुरू आहे.