जिल्ह्यातील 30 हजार मतदारांवर वगळणीची टांगती तलवार! मंगळवारपर्यंत ‘हे’ न केल्यास यादीतून मिळणार डच्चू!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सुमारे 30 हजार मतदारांनी येत्या मंगळवारपर्यंत आपली ‘ती’ घोडचूक दुरुस्त न केल्यास त्यांच्यावर नंतर घोर पश्चातापाची वेळ येणार आहे. याचा फटका केवळ त्यांनाच नव्हे तर नजीकच्या काळातील सर्व निवडणुका लढण्यास इच्छुक लहान मोठ्या नेत्यांना देखील बसणार असल्याने त्यांनीही आळस झटकून तात्काळ हालचाल करणे आवश्यक ठरले आहे. …
 
जिल्ह्यातील 30 हजार मतदारांवर वगळणीची टांगती तलवार! मंगळवारपर्यंत ‘हे’ न केल्यास यादीतून मिळणार डच्चू!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सुमारे 30 हजार मतदारांनी येत्या मंगळवारपर्यंत आपली ‘ती’ घोडचूक दुरुस्त न केल्यास त्यांच्यावर नंतर घोर पश्चातापाची वेळ येणार आहे. याचा फटका केवळ त्यांनाच नव्हे तर नजीकच्या काळातील सर्व निवडणुका लढण्यास इच्छुक लहान मोठ्या नेत्यांना देखील बसणार असल्याने त्यांनीही आळस झटकून तात्काळ हालचाल करणे आवश्यक ठरले आहे.

होय याचे कारण देखील तेवढेच गंभीर आहे. थोड्या फार फरकाने अनेक निवडणुकांचा निकाल लागत असताना जिल्ह्यातील तब्बल 29 हजार 490 मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. यात बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील 17 हजार 98, चिखली मतदारसंघातील 6842, जळगाव जामोदमधील 2270, सिंदखेड राजामधील 2062 तर खामगाव मतदारसंघातील 426 मतदारांचा समावेश आहे. हे मतदार मूळ निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे व मतदारयादीत त्यांचे फोटोच नसल्याचे बिएलओना आढळून आले, यामुळे त्यांची नावेच यादीतून वगळण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यामुळे त्यांनी आतातरी कुंभकर्णी झोपेतून जागी होणे व मतदारांच्या भरवश्यावर मोठे होणाऱ्या सर्व पुढाऱ्यांनी देखील जागे होणे गरचेचे ठरले आहे.

मंगळवार डेड लाईन
दरम्यान कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असली तरी या 30 हजार मतदारांना अखेरची संधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यांनी 15 जूनपर्यंत आपला अलीकडच्या काळातील कलर फोटो बूथ लेव्हल ऑफिसरकडे वा तहसील कार्यालयात नेऊन दिला तर यादीतून हकालपट्टीची अर्थात मतदानाला मुकण्याची कारवाई टळू शकते, मात्र तेव्हढीही तसदी घेतली नाही तर मात्र….