जिल्ह्यात 64 कोरोनाबाधितांची भर; 41 रुग्णांना डिस्चार्ज
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, 5 फेब्रुवारीला 64 नव्या कोरोनाबाधितांची भर पडून एकूण बाधितांचा आकडा 14213 वर पोहोचला. कोरोनावर मात करणार्या 41 रुग्णांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 467 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 403 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 318 तर रॅपिड टेस्टमधील 85 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव शहर : 2, बुलडाणा तालुका : वरवंड 1, देऊळगाव राजा तालुका : सरंबा 1, आळंद 1, देऊळगाव राजा शहर : 9, चिखली शहर : 7, चिखली तालुका : अंचरवाडी 1, शेलगाव आटोळ 2, सावरगाव डुकरे 1, लोणार शहर : 9, मलकापूर तालुका : दाताळा 3, मलकापूर शहर : 6, बुलडाणा शहर: 11, नांदुरा शहर : 1, जळगाव जामोद शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : गुंज 1, सिंदखेड राजा शहर : 1, लोणार तालुका : पांग्रा 1, बिबी 1, शेगाव शहर : 2, मूळ पत्ता जळगाव खानदेश 1, खुपटा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 64 रुग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान पारंबी ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा बुलडाण्यात मृत्यू झाला आहे.
41 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 41 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः देऊळगाव राजा : 9, चिखली : 6, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 4, अपंग विद्यालय 5, शेगाव : 2, खामगाव: 11, नांदुरा : 1, मेहकर :3.
353 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 111539 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13689 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1156 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14213 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयांत 353 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 171 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.