चिखली भाजपाने जाळला आमदार गायकवाडांचा पुतळा

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध केलेल्या अवमानकारक व गलिच्छ वक्तव्याचा चिखली भारतीय जनता पक्षातर्फे गायकवाडांचा पुतळा जाळून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. सोबतच आमदार गायकवाड यांनी केलेल्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध केलेल्या अवमानकारक व गलिच्छ वक्तव्याचा चिखली भारतीय जनता पक्षातर्फे गायकवाडांचा पुतळा जाळून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. सोबतच आमदार गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली.

आज, 18 एप्रिलला चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षातर्फे आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यात आला.  यावेळी शहराध्यक्ष पंडित दादा देशमुख, तालुका अध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुदर्शन खरात, नगरसेवक  गोविंद भाऊ देव्हडे, सुहास दादा शेटे, सुभाष आप्पा झडगे, अनुप महाजन, हरिभाऊ परीहार, सागर पुरोहित, युवराज भुसारी, भारत दानवे, महेशभाऊ लोणकर, संजय अतार, दानवे, सिद्धेश्वर ठेंग, अशोक भाऊ अग्रवाल, दिलीप डागा ,किशोर जामदार, विकी शिनगारे, ॲड. संजीव सदार, सादिक भाई काझी, नरेंद्र मोरवाल, अनमोल ढोरे, सचिन कोकाटे, शंकर देशमाने, सचिन कुलवंत, शंकर ऊद्रकर उपस्थित होते.