चिखली तालुक्यात आज 19 ग्रामपंचायतींचे कोण झाले सरपंच, उपसरपंच वाचा…; 1 जागा रिक्त, 20 उपसरपंचाची निवड
चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल 20 गावांच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज, 10 फेब्रुवारीला दुसर्या दिवशी सुद्धा 20 गावांची निवडणूक शांततेत पार पाडली. यात 19 ग्रामपंचायतींचे सरपंच निवडले गेले तर भोगावती येथे आरक्षित पदाचा उमेदवार नसल्याने तेथील सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले. दुपारी 2 च्या ठोक्याला सुरू झालेली निवडणुक अवघ्या काही मिनिटांत पार पडल्यानंतर गावागावात निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. अमडापूर आणि चिखली पोलिसांनी यावेळी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
असे आहेत नवीन कारभारी…
येवता सरपंच जया निवृत्ती मैद,उपसरपंच शोभा त्र्यंबक सुरडकर, वळती सरपंच उज्ज्वला सुनील चिंचोले, उपसरपंच शेख असलम शेख हमीद, सावरगाव डुकरे सरपंच वर्षा निवृत्ती डुकरे, उपसरपंच सचिन सुभाष पाटील, नायगाव बुद्रूक सरपंच गणेश पुरुषोत्तम जवजाळ, उपसरपंच वासुदेव रामेश्वर गायकवाड, मालगणी सरपंच प्रकाश नारायण चिंचोले, उपसरपंच संजय वामन काळे, तेल्हारा सरपंच किरण संजय गाडेकर, उपसरपंच शिवकन्या भुजंग कुटे, शिंदी हराळी सरपंच स्वाती प्रमोद सपकाळ, उपसरपंच संतोष शेषराव साळवे, बोरगाव काकडे सरपंच सुनंदा विजय सोरमारे, उपसरपंच ताईदेवी सुभाष पडघान, हातणी सरपंच कासाबाई रामेश्वर जाधव तर उपसरपंच प्रल्हाद भिकाजी जाधव, पेठ सरपंच विष्णू शत्रुघ्न शेळके तर उपसरपंच शिला भगवान गायकवाड, सवना सरपंच सत्यभामा समाधान सुरडकर तर उपसरपंच विद्या तुकाराम देव्हडे, शेलूदच्या सरपंचपदी राधाबाई राजाभाऊ मोरे, उपसरपंच कमल श्यामराव भिसे, भोरसा सरपंच कमल विकास गवई, उपसरपंच शेख अल्ताफ शेख इस्माईल, टाकरखेड हेलगा सरपंच दिलीप भास्कर हेलगे तर उपसरपंच संगीता नागोराव पैठणे, गोद्री सरपंचपदी सकुबाई भानुदास दहिकर तर उपसरपंच भरत रमेश जोगदंडे, मंगरूळ नवघरे सरपंचपदी नलिनी श्यामराव जाधव तर उपसरपंच बद्रीनारायन गणेश वाकडे, भोगावती येथे आरक्षित प्रर्वगाचा उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्त तर उपसरपंच जावेद खा अजीज खा, अंत्री कोळी रामेश्वर रंगनाथ वाघ तर उपसरपंच गीता गजानन ठेंग, दहिगाव सरपंच मीना विनोद खरपास तर उपसरपंच पांडुरंग रमेश नाब्दे, केळवद सरपंचपदी नमर्दाबाई दामोधर गवई तर उपसरपंच पदी कडूबा प्रल्हाद पाटील यांची निवड करण्यात आली.
चिखली तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींपैकी 20 गावांची सरपंच उपसरपंच पदाची काल 9 फेब्रुवारी रोजी, 20 गावांची आज 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आली तर उर्वरित 20 गावांची निवडणूक उद्या 11 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.