चांडोमध्ये मत फुटले; उपसरपंचपदी निर्मलाबाई देशमुख!
चांडोळ (प्रमोद गायकवाड) ः चांडोळच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज, 28 जूनला शांततेत पार पडली. उपसरपंचपदी निर्मलाबाई वसंतराव देशमुख यांची निवड झाल्याचे ग्राम विकास अधिकारी संदीप शिंदे यांनी जाहीर केले. ग्रामविकास आघाडीतर्फे निर्मलाबाई देशमुख तर ग्रामविकास पॅनेलतर्फे नलिनी मदन जंजाळ यांनी अर्ज भरला होता. गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. निर्मलाबाई देशमुख यांना नऊ मते मिळाली तर नलिनी …
Jun 28, 2021, 19:54 IST
चांडोळ (प्रमोद गायकवाड) ः चांडोळच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज, 28 जूनला शांततेत पार पडली. उपसरपंचपदी निर्मलाबाई वसंतराव देशमुख यांची निवड झाल्याचे ग्राम विकास अधिकारी संदीप शिंदे यांनी जाहीर केले.
ग्रामविकास आघाडीतर्फे निर्मलाबाई देशमुख तर ग्रामविकास पॅनेलतर्फे नलिनी मदन जंजाळ यांनी अर्ज भरला होता. गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. निर्मलाबाई देशमुख यांना नऊ मते मिळाली तर नलिनी जंजाळ यांना सात मते मिळाली. मुस्लिम उपसरपंच फैमिदा पठाण यांच्या अकाली निधनाने उपसरपंचपद रिक्त झाले होते. दोन्ही पॅनलकडे आठ सदस्य संख्या आहे. मात्र विजयी उमेदवारास नऊ मते मिळाल्याने कुणाचे मत फुटले याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत.