ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सिंदखेड राजाचे प्रशासन सज्ज!

सिंदखेड राजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने सिंदखेड राजा तालुक्यात तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यात पुरुष मतदार 37 हजार 756 आहेत तर स्त्री मतदार 71 हजार 740 आहेत. 160 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. 15 …
 

सिंदखेड राजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने सिंदखेड राजा तालुक्यात तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यात पुरुष मतदार 37 हजार 756 आहेत तर स्त्री मतदार 71 हजार 740 आहेत. 160 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सिंदखेडराजा येथील नगरपरिषदेच्या टाऊन हॉलमध्ये होणार आहे. खबरदारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार प्रवीण लटके यांनी टाऊन हॉलची पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेत नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर, नायब तहसीलदार पंकज मगर, एस. डी. बंगाळे, विस्तार अधिकारी बी. डी. घुगे, यू. ए. म्हस्के, एस. एल. पापुलवाड, के. आर. सोळंकी, एस. एस. उबाळे, जी. बी. बोरे, आर. आर. कहाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदत केंद्र, आचारसंहिता केंद्र तयार करण्यात आले आहेत. मदत केंद्राचे काम नायब तहसीलदार प्रवीण लटके तर आचारसंहिता केंद्राचे काम गटविकास अधिकारी एच. जी. कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. निवडणुकीसाठी तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.