खासदारांना “सोशल’ आधार बराच कमी!; आमदार एकडे शेवटून पहिले..!; श्वेताताई महाले आहेत टॉपवर, त्‍यांच्‍याकडे खासदारांपेक्षा पाचपट जास्त फॉलोअर्स!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्याचे युग सोशल मीडियाचे म्हटले जाते. जो तो सोशल मीडियावर आहे. ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो प्रत्येक जण फेसबुकवर दिसतोच दिसतो. व्टिटर, इन्स्टाग्रामवर असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. व्हॉट्स ॲप तर प्रत्येक जण वापरतो… त्यामुळे नेतेमंडळींना मतदारांच्या संपर्कात राहायचे असेल सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नेतेमंडळीही या माध्यमाचा कसोशीने प्रयत्न करतात. त्यासाठी …
 
खासदारांना “सोशल’ आधार बराच कमी!; आमदार एकडे शेवटून पहिले..!; श्वेताताई महाले आहेत टॉपवर, त्‍यांच्‍याकडे खासदारांपेक्षा पाचपट जास्त फॉलोअर्स!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्याचे युग सोशल मीडियाचे म्‍हटले जाते. जो तो सोशल मीडियावर आहे. ज्‍याच्‍याकडे स्‍मार्टफोन आहे तो प्रत्‍येक जण फेसबुकवर दिसतोच दिसतो. व्‍टिटर, इन्‍स्‍टाग्रामवर असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. व्हॉट्‌स ॲप तर प्रत्‍येक जण वापरतो… त्‍यामुळे नेतेमंडळींना मतदारांच्‍या संपर्कात राहायचे असेल सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. त्‍यामुळे नेतेमंडळीही या माध्यमाचा कसोशीने प्रयत्‍न करतात. त्‍यासाठी काहींनी स्वतंत्र माणसेही नेमली आहेत. माझ्या मागे एवढे लोक आहेत, असे पूर्वी नेते म्‍हणायचे. सोशल मीडियाने खरंच त्‍यांच्‍यामागे किती लोक आहेत, हेही दाखवून दिले आहे हे विशेष. यात आपल्या जिल्ह्यातील चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले अव्वलस्‍थानी आहेत. फेसबुक, व्टिटर किंवा इन्‍स्‍टाग्रामवर त्‍यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. त्‍यांच्‍यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा नंबर लागतो. पालकमंत्री, खासदारांना हा “सोशल’ आधार मात्र बराच कमी आहे. आमदार एकडे तर शेवटून पहिले असल्याचे कटू वास्तव आहे.

लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते, चाहत्यांच्‍या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. केलेली कामे, दौरे, राजकीय परिस्थितीवरील त्यांची भूमिका व्यक्त करण्यासाठी ते सोशल मीडियाचा उपयोग करतात. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी स्वतःची खाती उघडली असून, त्यावर नियमित अपडेट राहण्याचा प्रयत्न नेत्यांकडून होतो. चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील याबाबतीत आघाडीवर असून, त्यांचे फेसबूक, इंस्टाग्राम,ट्विटर वरील फॉलोअर्स म्हणजेच चाहत्यांची एकत्रित संख्या ही दीड लाखापेक्षाही अधिक आहे. ताईंच्या तुलनेत जिल्ह्यातील इतर आमदार, खासदार व पालकमंत्री बरेच मागे आहेत. श्वेताताई वगळता जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आघाडीवर आहेत. फॉलोअर्सच्या बाबतीत तुपकर यांचा ताईनंतर दुसरा क्रमांक लागतो.

कुणाचे किती फॉलोअर्स…

  • जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे फेसबूकवर खातेच सापडत नाही. (त्‍यांच्‍या कार्यालयीन सूत्रांनी तांत्रिक अडचणींमुळे ते दिसत नसल्याचे सांगितले. त्‍यामुळे फेसबुकवरील त्‍यांच्‍या फॉलाअर्सचा आकडा मिळू शकला नाही.) त्यांचे ट्विटरवर १८ हजार ६०० तर इन्स्टाग्रामवर ५ हजार ११७ फॉलोअर्स आहेत.
  • खासदारांचे फेसबूकवर १८ हजार ८४ तर इंस्टाग्रामवर २ हजार ३४७, फॉलोअर्स आहेत. व्टिटरवर खासदारांचे खाते नाही.
  • चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे फेसबूकवर तब्बल १ लाख २३ हजार ५६५ इन्‍स्टावर ३५ हजार ५०० तर व्टिटरवर १४ हजार ८०० फॉलोअर्स आहेत. ताई तिन्ही माध्यमांवर सक्रीय असतात.
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे फेसबूकवर ६७ हजार २९२, इन्‍स्टावर ७ हजार ३५७ व व्टिटरवर ३ हजार ३९३ फॉलोअर्स आहेत.
  • भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांचे फेसबूकवर ३४ हजार ३७२ इन्‍स्टावर २ हजार ८३९ फॉलोअर्स आहेत. व्टिटरवर फुंडकर यांचे खाते नाही.
  • बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे फेसबूकवर २१ हजार ३९, इन्‍स्टावर १ हजार १७५ तर इन्‍स्टावर ५२५ फॉलोअर्स आहेत.
  • जळगाव जामोदचे आमदार माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांचे फेसबूकवर २० हजार ८४१, इन्‍स्टावर ६ हजार ९६१ तर व्टिटरवर १४ हजार ८०० फॉलोअर्स आहेत.
  • मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांचे फेसबूकवर १६ हजार ४३, इन्‍स्टावर ३ हजार ४२ व व्टिटरवर १७४ फॉलोअर्स आहेत.
  • मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांचे फेसबूकवर ७ हजार ७२६, इन्‍स्टावर १ हजार ५३९ व व्टिटरवर ३८६ फॉलोअर्स आहेत.
    (जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल्समध्ये बुलडाणा लाइव्ह खूप पुढे आहे. वर्षभरात ते टॉपवर आले असून, फेसबुक पेजवर नियमित अपडेट्‌समुळे २२ हजार ५९२ फॉलोअर्स आहेत, तर खात्यावर ५ हजार मित्रमर्यादा सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. आजच्या तारखेपर्यंत 649 व्हॉट्‌स ॲप ग्रुप असून, सुमारे दीड लाख बुलडाणेकरांचे नंबर्स बुलडाणा लाइव्हला ॲड आहेत. इन्‍स्‍टाग्रामवर ९२३ तरुण फॉलोअर्स आहेत.)