एकोपा दिसला…जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणखी किती गावात असा एकोपा दिसून येतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लावणा (ता. मेहकर), पळशी खुर्द (ता. खामगाव), पिंप्री कोरडे (ता. खामगाव), शेंबा (ता. नांदुरा), पळसखेड भट (ता. बुलडाणा), पाडळी शिंदे (ता. देऊळगाव राजा) या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणखी किती गावात असा एकोपा दिसून येतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लावणा (ता. मेहकर), पळशी खुर्द (ता. खामगाव), पिंप्री कोरडे (ता. खामगाव), शेंबा (ता. नांदुरा), पळसखेड भट (ता. बुलडाणा), पाडळी शिंदे (ता. देऊळगाव राजा) या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तशी अधिकृत घोषणा फक्त 4 जानेवारीला होईल. राजकीय वाद, अवास्तव खर्च टाळण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी विकासकामांसाठी निधी देण्याचे दिलेले आश्‍वासन कामी आल्याचे यातून दिसून येत आहे.