आ. संजय गायकवाड उवाच्‌… अतिवृष्टीमुळे नुकसान होते याला शेतकऱ्यांचा निष्काळजीपणाही जबाबदार; नदीकाठच्या थोड्याशा जागेचे दानपत्र शासनाला द्या!; एकरी ५० लाख दिले तरी नुकसान भरून निघणार नाही!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी ५० लाख रुपये नुकसानभरपाई दिली तरी नुकसान भरून येणार नाही. काही शेतकरी नदीकाठावर अतिक्रमण करतात. त्यांचा निष्काळजीपणादेखील याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या भल्यासाठी नदीकाठच्या थोड्याशा जागेचे दानपत्र शासनाला द्यावे. नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. नद्यांचे खोलीकरण …
 
आ. संजय गायकवाड उवाच्‌… अतिवृष्टीमुळे नुकसान होते याला शेतकऱ्यांचा निष्काळजीपणाही जबाबदार; नदीकाठच्या थोड्याशा जागेचे दानपत्र शासनाला द्या!; एकरी ५० लाख दिले तरी नुकसान भरून निघणार नाही!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी ५० लाख रुपये नुकसानभरपाई दिली तरी नुकसान भरून येणार नाही. काही शेतकरी नदीकाठावर अतिक्रमण करतात. त्‍यांचा निष्काळजीपणादेखील याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या भल्यासाठी नदीकाठच्या थोड्याशा जागेचे दानपत्र शासनाला द्यावे. नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले तर नुकसान टाळता येऊ शकते. पुढील काळात नद्यांचे खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.

मतदारसंघातील अतिवृष्टी यासंदर्भात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी आज, ११ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे नदीचा नाला व नाल्याचे रूपांतर ओढ्यात झाले. त्यामुळे पुराचे पाणी शेतात व घरात घुसते. यामुळेच शेतकरी आर्थिक संकटात सापडला, असे आमदार गायकवाड म्हणाले. नागरिकांनी निसर्गाला रोखण्याचा प्रयत्न करू नये. ती ताकद माणसात नाही. नदीकाठची दहा फूट जागा सोडली तर शेतकऱ्यांची दहा एकर शेती वाचू शकते. शेतकऱ्यांनी त्यांच्या भल्यासाठी नदीकाठच्या थोड्याशा जागेचे दानपत्र शासनाला द्यावे. त्यामुळे शासन देखील मदत करेल.

मतदारसंघात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता येणार नाही. मात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गायकवाड म्हणाले. दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करते. एका वर्षी केल्या जाणाऱ्या मदतीच्या खर्चात हा विषय मार्गी लावता येऊ शकतो. यासाठी विशेष प्रयत्न करणार व नद्यांचे व नदीकाठच्या शेतांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणातून नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्यात येईल. शेतकऱ्यांनी नदीकाठची थोडीशी जागा सोडली तर भविष्यात मोठे नुकसान टाळले जाऊ शकते, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.