…अन्‌ मुकूल वासनिक आलेच नाहीत!; एकदा तब्‍येतीचे, आता बैठकीचे कारण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः बहुप्रतिक्षित असलेला मुकुल वासनिक यांचा जिल्हा दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. आज, १९ जुलैला ते जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र दौरा रद्द झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीची तातडीची बैठक ठरल्याने वासनिकांचा हा दौरा रद्द झाला. तसा निरोप …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः बहुप्रतिक्षित असलेला मुकुल वासनिक यांचा जिल्हा दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. आज, १९ जुलैला ते जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र दौरा रद्द झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीची तातडीची बैठक ठरल्याने वासनिकांचा हा दौरा रद्द झाला. तसा निरोप पहाटे जिल्हा काँग्रेस समितीला देण्यात आला. यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निराशा झाली. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा वासनिक यांचा जिल्हा दौरा रद्द झाला आहे. अनेक प्रलंबित विषय वासनिक यांच्या कानावर घालण्याची संधी मिळणार असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र पुन्हा एकदा वासनिक यांचा दौरा रद्द झाल्याने त्‍यांची निराशा झाली आहे. आता पुन्हा कधी वासनिक जिल्ह्यात येणार या प्रश्नाचे उत्तर सध्या कुणाकडेही नसल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही पुन्हा इंतजार करावा लागणार आहे.