तुम्ही जयश्रीताईंना आमदार करा! जालिंदर बुधवतांना आमदार करण्याची जबाबदारी माझी; हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने उद्धव ठाकरेंनी दिला शब्द...
Nov 8, 2024, 16:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जालिंदर बुधवंत यांना मी निवडणुकीसाठी शब्द दिला होता. त्यांनी तयारी देखील सुरू केली होती.. मात्र त्यांना थांबायला सांगितले आणि ते थांबले..अशी निष्ठावान माणसे फक्त शिवसेनेत सापडतात. आज मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने शब्द देतो.. तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईंना आमदार करा.. जालिंदर बुधवत यांना आमदार करण्याची जबाबदारी माझी.." असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाण्यात झालेल्या जाहीर सभेत हजारो जनसमुदायाच्या साक्षीने दिला. यावेळी टाळ्यांचा एकच गजर झाला.. उद्धव ठाकरेंना भाषणाला आमंत्रित करण्यापूर्वी सूत्रसंचालक गजानन धांडे यांनी जनभावनेचा उल्लेख करत जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या बाबत व्यक्त केलेल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हात घातला.. बुधवत यांच्या त्याग आणि निष्ठेचे कौतुक उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले...
बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा निवडणुका घोषित होण्याच्या आधीपासूनच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी तयारी सुरू केली होती..त्यांचे तिकीट फायनल समजल्या जात होते. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही दिले होते. मात्र ऐनवेळी राजकीय समीकरणांमुळे बुधवंत यांना थांबण्याचे सांगण्यात आले आणि जयश्रीताई शेळके यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. विशेष म्हणजे २०१४ आणि २०१९ यावेळीही बुधवंत यांना शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती.. पक्षादेश शिरसावंद मानूनच बुधवंत यांनी आतापर्यंत निष्ठेने शिवसेनेचे काम केले. शिवसेना पक्ष फुटी नंतर खासदार आणि दोन आमदार शिंदे गटात गेले तेव्हा जालिंदर बुधवंत यांनी शिवसेना वाढवली.संघटन मजबूत केले होते.. ऐनवेळी जयश्रीताईंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडूनहीं बुधवंत यांनी नाराज नव्हता जयश्रीताईंच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या हाती घेतली आहे.दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी हजारो जनसमुदायाच्या साक्षीने बुधवंत यांना आमदार करण्याचा शब्द दिला.. तुम्ही सगळे मिळून जयश्री ताईंना आमदार करा बुधवंत यांना आमदार करण्याची जबाबदारी माझी असे म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट सभास्थळी झाला.. "आमच्याकडे फसवा फसवी चालत नाही.. शिवसेनेत शब्दाला किंमत आहे." असेही यावेळी उद्घव ठाकरे म्हणाले..