होय..दिसतोय फरक म्हणून श्वेताताई परत! नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारच आले धावून..
Nov 16, 2024, 10:22 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):एका दाण्याचे हजार दाणे करणारा मायबाप शेतकरी अनेकदा अनंत अडचणींचा सामना करतो.. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे त्याच्यावर कोसळत असतात..मात्र तरीही धीरोधात्तपणे या संकटांना तोंड देत जगाची भूक मिटवण्याची काळजी तो वाहत असतो.. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर जर संकट कोसळले तर अशा संकटसमई मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच असते. हे कर्तव्य निभावण्यात महायुती सरकारने कोणतीच कसर सोडली नाही..मात्र त्या तुलनेत २०१४ पूर्वी असलेल्या सरकारने मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला कोरडी पानेच पुसल्याचे समोर आले आहे. चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी कृषी विभागाकडे मागितलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.
२००४ ते २०१४ या काळात राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित क्षेत्राकरता विशेष दराने केवळ २२.५५ लाख हेक्टर करिता ३००३.४५ कोटी रुपयांची मदत तत्कालीन सरकारने केली होती. मात्र त्या तुलनेत २०१४ नंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आतापर्यंत १६९.१८ लाख एवढ्या मोठ्या क्षेत्राकरिता तब्बल १४०३८.५२ कोटी एवढे अर्थसहाय्यक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. राज्याच्या महसूल व पुनर्वसन विभागामार्फत ही मदत देण्यात आली. एवढ्यावर महायुती सरकार थांबले नाही तर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात देखील मदत उपलब्ध करून देण्यात महायुती सरकारच समोर आहे. महायुती सरकारने ५३०.५९ लाख हेक्टर साठी ६४५.१९ लाख शेतकऱ्यांना ४७४७९.७१ कोटी रुपयांचे सहाय्य निविष्ठा स्वरूपात केले. त्या तुलनेत २०१४ पूर्वीच्या सरकारने केवळ १८१२१.९७ कोटी रुपयांचे सहाय्य केले होते.
आमदार श्वेताताईंनी केला पाठपुरावा..
जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली तेव्हा तेव्हा चिखल तुडवत श्वेताताईंनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन धीर दिला. केवळ कोरडा धीर देऊन श्वेताताई थांबल्या नाहीत तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला. शेती प्रश्नांवर श्वेताताईंची सभागृहातील भाषणेही चांगलीच अभ्यासपूर्ण ठरली. महायुती सरकार आल्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी श्वेताताईंनी अनेक योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले.त्याचा रिझल्ट आता दिसू लागला आहे, त्यामुळेच दिसतोय फरक श्वेताताई परत अशा घोषणा गावोगावचे शेतकरी देत आहेत...