व्वा..याला म्हणतात प्रेम! डॉ.संजय रायमुलकरांच्या विजयासाठी शेतकरी पुत्रांची पैदल वारी! संत गजानन महाराजांना घालणार साकडे! शेतकरी पुत्र म्हणतात, डॉ. रायमुलकर आमच्यासाठी "देवमाणूस"...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या लाडक्या नेत्याप्रती निष्ठा अन् प्रेम किती असावे याची वेगवेगळे उदाहरणे देता येईल.. मेहकर विधानसभा मतदारसंघात तर विद्यमान आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आहेत..अर्थात आ.डॉ.संजय रायमुलकरही आपल्या कार्यकर्त्यांना तेवढंच जीवापाड जपतातही..हे इथ सांगण्याच कारण आहे ती एक "पैदल वारी"..मेहकर मतदारसंघातील बोरी येथील ४ शेतकरी पुत्रांनी आ. रायमुलकर यांच्या विजयासाठी बोरी ते श्री क्षेत्र शेगाव अशी पैदल वारी काढली आहे..श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते आ.डॉ. रायमुलकर यांच्या रेकॉर्ड ब्रेक विजयासाठी साकडे घालणार आहेत...
  बोरी येथील निखिल किशोर चनखोरे, अनंथा किसन ठगे, भागवत पुंजाजी आव्हाळे, दगडु डीगांबर नरवाडे हे चार शेतकरी पुत्र डॉ.संजय रायमुलकर यांच्या विजयाचे साकडे घालण्यासाठी शेगावला निघाले आहेत. "आमच्या देवासाठी आम्ही देवाला साकडे घालण्यासाठी जात आहोत.डॉ.संजय रायमुलकर आमच्यासाठी आणि आमच्या मतदारसंघासाठी देव माणूस आहेत.त्यामुळे श्री. गजाननाचरणी त्यांच्या विजयासाठी साकडे घालणार आहोत" अशा भावना निखिल चनखोरे यांनी व्यक्त केल्या..