संघटनात्मक बळवाढीसाठी जोमाने कामाला लागा! खासदार अरविंद सावंत यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सुचना!
बुलडाणा विश्रामगृह येथे सकाळी सुमारे अकरा वाजेपासून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आणि सर्कल निहाय माहिती त्यांनी जाणून घेतली. चार ते साडेचार तासात सातही विधानसभा मतदारसंघांच्या सर्कल निहाय पदाधिकाऱ्यांचा कार्य अहवाल जाणून घेतला. यावेळी स्पष्ट सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ,उप तालुकाप्रमुख, शहर प्रमुख उप शहरप्रमुख तसेच शिवसेना अंतर्गत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी स्वतः थेट संवाद साधल्याने कार्यकर्त्यांना उत्साह वाढला आहे.
खा.अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेना ही सत्तेसाठी नाही समाजासाठी आहे. मुंबईमध्ये आपण विजय मेळावा नुकताच घेतला. मराठी माणसांसाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना आहे. महायुती सरकारने लोकप्रिय घोषणाच्या नावाखाली लबाडाघरचा अवतन दिल. शेतकऱ्यांचे आज मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कर्जमाफीचा गाजर दाखवण्यात आलं. निवडणूक पूर्व लोकप्रिय घोषणांचा रतीब घातला. आज प्रत्यक्षात त्या योजनांचं काय झालं हा मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आगामी नगरपालिका , महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. पदाधिकाऱ्यांनी यासाठी नियोजन पूर्वक परिश्रम घ्यावेत. संघटनात्मक बळवळीसाठी शाखा बांधणी कडे अधिक लक्ष द्यावे अशा सूचना देखील त्यांनी याप्रसंगी केल्या. यावेळी
शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके ,जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, विजयाताई खडसन, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने, गोपाल बच्छिरे, यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख ,तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख , शहर प्रमुख व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.