विकास गंगेचा प्रवाह अबाधित ठेवण्यासाठी पंडितदादांना विजयी करा! ह. भ. प प्रकाश महाराज जवंजाळ यांचे चिखलीकरांना आवाहन....
Dec 1, 2025, 17:51 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी साडेतीन वर्षाच्या सत्ता काळात चिखली विधानसभा मतदारसंघासह शहराचा भरभरून विकास केला आहे. गेल्या पन्नास वर्षात जी कामे झाली नाहीत, ती आमदार श्वेताताईंनी साडेतीन वर्षात मार्गी लावली आहेत. विकास कन्येने सुरू केलेल्या या विकासगंगेचा प्रवाह अबाधित ठेवण्यासाठी चिखली नगरपालिकेत भाजपची सत्ता आवश्यक आहे.. या विकासगंगेच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे, त्यामुळे काँग्रेसला धडा शिकवा, अद्दल घडवा आणि नगरपालिकेत पंडित दादा देशमुख यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले आहे.
काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, एवढे वाईट दिवस काँग्रेसला आले आहे की चिखली शहरात त्यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देखील मिळाला नाही.. त्यांनी घरातीलच उमेदवार उभा केला. काँग्रेसला विकासाचे देणे घेणे नाही, सामान्य माणसांच्या अडचणीशी त्यांना देणे घेणे नाही..त्यांना केवळ स्वतःचा परिवार मोठा करायचा आहे असा घणाघात प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केला. काँग्रेसच्या माजी आमदारांनी दहा वर्षात चिखली विधानसभा मतदारसंघाची वाट लावली... स्वतःचे घर भरण्याचे काम केले. प्रचंड भ्रष्टाचार केला..स्वतः १० वर्षात काही करता आले नाही आता काय दिवे लावणार? असा खडा सवालही त्यांनी केला.