EXCLUSIVE झालं कुणाचं भल रे दादा झालं कुणाचं भलं....! आक्रोश मोर्चात सरकारविरोधी लोकगीते वेधतायेत लक्ष; बुलडाण्यात भगवा जनसागर उसळला.....

 
Buldhan

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात आज बुलडाणा शहरात भव्य आक्रोश मोर्चा निघत आहे. गावागावातील हजारो शेतकरी , महिला बुलडाणा शहरात मोर्चासाठी दाखल झाले आहेत.एकंदरीत बुलडाणा शहरात भगवा जनसागर उसळला असल्याचे चित्र आहे. 

जिजामाता प्रेक्षगार मैदानाजवळ टिळक नाट्य मंदिराच्या आवारातून या मोर्चाला सुरुवात होत आहे. शेकडो बैलगाड्या, ट्रॅक्टर, विविध देखावे यामुळे या मोर्चाकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. ट्रॅक्टर वर असलेले लोककलाकरांचे पथक आपल्या लोक गीतांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अच्छे दिन कहा गये..

झालं कुणाचं भल रे दादा झालं कुणाचं भल,या मोदी सरकारमुळे झालं कुणाचं भल, या खोके सरकारमुळे झालं कुणाचं भल...अशा गीतांची जोरदार मेजवानी मोर्चासाठी दाखल झालेल्या मोर्चेकरांसाठी सुरू आहे.... विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार अरविंद सावंत बुलडाणा शहरात पोहोचले असून अगदी थोड्या वेळात हा मोर्चा सुरु होणार आहे....