रविकांत तुपकरांच्या सावळा गावात लीड कुणाला?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढत अतिशय रंगतदार आणि चुरशीची झाली. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ही लढत चालली..अखेर शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांचा ८४३ मतांनी पराभव करीत विजय साकारला. दरम्यान आता निकालानंतर कोणत्या गावात कुणाला लीड मिळाला... याच्या चर्चा ठिकठिकाणी सुरू आहेत.. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका असल्याचे जाहीर केले होते..
कार्यकर्त्यांना आपण कुठल्याच प्रकारचे आदेश देणार नाही असेही रविकांत तुपकर यांनी म्हटले होते..दरम्यान आता रविकांत तुपकर यांचे गाव असलेल्या सावळा गावात संजय गायकवाड यांनी मोठी आघाडी घेतल्याचे निकालांती दिसून आले आहे. संजय गायकवाड यांना सावळा गावात २४३ तर महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांना ११२ मते मिळाली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख लखन गाडेकर हे सावळा येथीलच असून त्यांना मात्र जयश्री शेळके यांना आघाडी मिळवून देण्यात अपयश आले आहे. याउलट शिंदेच्या शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल जगताप यांनी संजय गायकवाड यांना आघाडी मिळवून देण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला यश आले आहे...