हर्षवर्धन सपकाळ यांच्या उमाळा गावात लीड कुणाला? जयश्री शेळके की संजय गायकवाड...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढत अत्यंत चुरशीची झाली. शेवटपर्यंत काटे की टक्कर झालेल्या या लढतीत महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. महाविकास आघाडीने ही संजय गायकवाड यांना तगडी फाईट दिली.. जयश्री शेळके यांचा अवघ्या ८४३ मतांनी पराभव झाला.. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने जयश्री शेळके यांचे काम केले.. उमेदवारी घोषित होण्याआधी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू होत्या.. जागा काँग्रेसला सुटावी यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी जोर लावला होता, मात्र अखेर काँग्रेस मधून शिवसेनेत घेत जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात आली.. त्यानंतरही काही दिवस मैत्रीपूर्ण लढत लढू द्यावी अशी मागणी काँग्रेसकडून होत होती, मात्र त्याला यश आले नव्हते..
दरम्यान आता कोणत्या गावात कोणाला किती लीड मिळाला याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत.. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उमाळा गावात जयश्री शेळके यांना भरभरून मते मिळाली आहेत.. बूथ क्रमांक ३०३ उमाळा येथे संजय गायकवाड यांना १९२ तर जयश्री शेळके यांना २४८ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत वाघोदे यांना इथे केवळ १ मत मिळाले आहे..जयश्री शेळके यांना उमाळा येथून ५६ मतांची लीड मिळाली आहे..