Amazon Ad

बोगस सह्या करून करोडो रुपये कमावणारा कोण?आ. रायमुलकरांचा सिद्धार्थ खरांतावर पलटवार!

 विजयाचा चौकार मारण्याचा विश्वास; म्हणाले, मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे....
 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्यांचा आणि मतदारसंघाचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही..कधी लोकांच्या सुखात नाही.. दुःखात नाही..ऐनवेळी येऊन निवडणूक लढवणाऱ्यांना जनता कशी साथ देईल? असा प्रतिसवाल करीत गेल्या तिन्ही निवडणुका विक्रमी मताधिक्याने आम्ही जिंकलो..यंदाची निवडणूक आधीच्या तिन्ही निवडणुकांचे रेकॉर्ड मोडीत काढील असा आत्मविश्वास आ. संजय रायमुलकर यांनी व्यक्त केला आहे.एका वृत्तवाहीनिशी बोलतांना त्यांनी हे विधान केले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यभरात झपाट्याने विकासकामे केली..एकट्या मेहकर विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या दोन वर्षांत तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा निधी आला असून त्याची कामे सुरू आहेत असेही आ. रायमुलकर म्हणाले. मेहकर विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत विकास झाला नाही असा आरोप विरोधक करतात, विरोधक कोणता चष्मा लावतात? कोणत्या नजरेने पाहतात हे त्यांचं त्यांना माहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

काही लोक आता आता मतदारसंघात आले आहेत, ते आमच्यावर बोलतात..वास्तविक त्यांना मतदारसंघाचा कुठलाही अभ्यास नाही.. मतदारसंघाचा नकाशा त्यांना माहीत नाही..त्यांची आधीची प्रकरणे पहा..राणे साहेबांची बोगस सही कुणी केली? त्यातून करोडो रुपये कुणी घेतले अशी टीका त्यांनी उबाठा शिवसेनेच्या सिद्धार्थ खरात यांच्यावर केली. मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनता हुशार आहे.. जनता असल्या लोकांवर विश्वास ठेवणार नाही..आम्ही ही निवडणूक विक्रमी मतांनी जिंकू असे आ.डॉ.संजय रायमुलकर म्हणाले..