जेथे जाती श्वेताताई, तेथे जमती आई - माई! जन आशीर्वाद दौऱ्यात लाडक्या बहिणीकडून श्वेताताईंना भरभरून पाठिंबा

 
 
                    
    जिल्हा परिषद सदस्य पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या श्वेताताई महाले यांनी २०१९ मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार म्हणून चिखली मतदारसंघातून पहिल्यांदाच विजय संपादन केला आणि आपल्या पहिल्याच कार्यकाळात विकासकामांचा उच्चांक गाठत मतदारसंघातील शहर व ग्रामीण परिसरात प्रगतीचे एक नवे पर्व सुरू केले. या निवडणुकीत देखील महायुतीच्या उमेदवार म्हणून जनतेसमोर पुन्हा एकदा आपल्या मतदान रुपी आशीर्वाद मागण्यासाठी आ. श्वेताताई महाले जात असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची श्वेताताईंनाच पसंती मिळेल याची खात्री पटते. 
       आपुलकीचा ओलावा अन् हाकेला साद
            मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, समाज भवन, सभामंडप आदी भौतिक विकासकामांची चौफेर प्रकरण करत असतानाच श्वेता ताईंनी वैयक्तिक लाभाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर देखील विशेष भर दिला. त्यामुळेच बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सुरक्षा किट असो की संसार बाटलीचे वितरण असो पात्र लाभार्थ्यांना या वस्तूंची उपलब्धता त्यांनी करून दिली. लाडकी बहीण योजनेमधून मतदारसंघातील सुमारे ६० हजार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे कसे जमा होतील याची काळजी जातीने लक्ष घालून घेतली. आयुष्यमान भारत कार्ड असो की वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना अशा प्रत्येक योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांशी थेट संपर्क साधून त्यांना या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आ. श्वेताताई महाले यांनी या अडीच वर्षात केले.
या निमित्ताने वेळोवेळी श्वेताताईंचा ग्रामीण भागातील महिलांची सातत्याने संपर्क येत गेला व या संपर्कातून माता भगिनींशी त्यांची नाळ जुळली ऋणानुबंध जोडले गेले. श्वेताताई आपल्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची जाणीव ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थी महिलेला असल्यामुळेच त्यांच्याबद्दलचा आपुलकीचा ओलावा महिला मतदारांच्या मनात असून श्वेताताई गावात आल्यानंतर त्यांच्या हाकेला ओ देत मोठ्या संख्येने माता भगिनी जमा होत असल्याचे गावोगावी पाहायला मिळते. 
महिलांचा दृढ निर्धार श्वेताताईच पुन्हा आमदार
             चिखली विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५७१८ मतदार असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या १ लाख ४८०५४ एवढी आहे. एक महिला आमदार म्हणून श्वेताताईंनी आपल्या पहिल्याच कारकिर्दीत केलेली भरभक्कम विकासकामे, विधानसभेत मांडलेले जनतेचे प्रश्न आणि एकूणच त्यांचा परफॉर्मर्स पाहता प्रत्येक महिला मतदाराला आपल्यातील एक भगिनी केवळ चिखलीचेच नव्हे तर महाराष्ट्राचे मैदान गाजवत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
श्वेताताई गावात आल्या की त्यांच्याभोवती जमलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरून हा अभिमान ओसंडून वाहत असतो, त्यांच्या डोळ्यातून आपुलकी ओथंबलेली दिसते आणि पुन्हा एकदा श्वेताताईंना आमदार म्हणून विजयी करण्याचा दृढनिर्धार ग्रामीण भागातल्या महिला मतदारांच्या देहबोलीतून जाणवतो.