महायुतीचे जागावाटप कधी? केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांचे महत्वाचे विधान! म्हणाले.

 
बुलडाणा
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप कधी? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. आज बुलडाणा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी देखील त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
पितृपक्ष झाल्यानंतर लवकरच महायुतीचे जागावाटप होईल. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यावर आमचा भर राहील असे ना.जाधव म्हणाले. एक दिवसांत या यासाठीची बैठक होईल. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला जागावाटपात किती जागा अपेक्षित आहे असे विचारले असता ना.जाधव म्हणाले की केवळ जागांची संख्या वाढवणे हा आमचा उद्देश नाही. महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असला पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील असे ना.जाधव म्हणाले.