क्या बात..!बुलडाण्यात साकारणार आधूनिक महसूल भवन, १५.७१ कोटी मंजूर ! अर्थसंकल्पात आ. संजय गायकवाड यांची महत्त्वपूर्ण कामगिरी....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या अर्थसंकल्पात बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाण्यात महसूल भवन उभारणीसाठी १५.७१ कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. मागील पाच वर्षांत त्यांनी जिल्ह्यात सर्वात अधिक विकास निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. या निधीतून शहराचा कायापालट करत चेहरा मोहरा बदलला आहे. अनेक रस्ते, महापुरुषांचे पुतळे, स्मारके, सौंदर्यीकरण, नाट्यगृह, वारकरी भवन आदी उभारले आहेत.
  बुलडाणा विधानसभा मतदार संघात मागील पाच वर्षात आ. गायकवाड यांनी मतदार संघाचा कायापालटच करुन टाकला. मतदार संघातील संपुर्ण रस्ते, महामानवांचे पुतळे, स्मारक, शहर सौदर्यकरण, सिचंन, नाटयगृह, वारकरी भवन, आरोग्य भवन, मेडीकल कॉलेज, कृषी महाविद्यालय आदी अनेक विषय पुर्णत्वास नेले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा निवडूण आल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या निर्माण कामांसाठी लक्ष घातले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात पहिल्याच दणक्यात आ. गायकवाड यांनी सुमारे १५ कोटी ७१ लाख रुपये सदर इमारतीसाठी मंजूर करुन घेतले आहे. या प्रस्तावित महसूल भवनाच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना महसूल संबंधित कामांसाठी सुलभ सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. महसूल भवनाच्या इमारतीत विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या इमारती मध्ये आधूनक स्वरुपाची पार्किंग, सेक्युरीटी कॅबीन, शौचालय, तहसीलदार ऑफीस, पहिल्या मजल्यावर नायब तहसीलदार कार्यालय, सेतू कार्यालय, कॉन्फरन्स रुम, दुसऱ्या मजल्यावर एसडीओ कार्यालय, निवडणूक विभाग, कॉप्यूटर रुम, रेकॉर्ड रुम, इव्हीएम स्ट्रांग रुम यांचा समावेश असेल. तिसऱ्या मजल्यावर लॅन्ड रेकॉर्ड कार्यालय, ॲसेंबली हॉल, स्ट्रांग रुम, सीएससी सेंटर, स्टेनो रुम, रेकॉर्ड रुम यांचा समावेश असेल. चौथ्या मजल्यावर कॅन्टींग, किचन, ऑडीटोरीयम, ग्रीन रुम, व्हीआयपी रुम आणि शौचालय यांचा समावेश असेल.
आमदार संजय गायकवाड यांनी या मंजुरीसाठी प्रयत्नशील राहून, हा प्रस्ताव यशस्वीरीत्या मंजूर करून घेतला. महसूल भवनाचे उभारणी कार्य लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच, बुलडाण्यातील विकासासाठी आणखी काही प्रकल्प मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. या नव्या महसूल भवनामुळे जिल्ह्यातील प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.