BIG BREAKING रविकांत तुपकरांच्या मनात काय? तुपकरांनी बुलडाणा विधानसभेसाठी घेतले ४ अर्ज; उद्याच अर्ज दाखल करण्याची शक्यता....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. बुलडाणा विधानसभेसाठी हे अर्ज घेतले असून रविकांत तुपकर उद्याच अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे..

  महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाणार नाही अशी घोषणा केली होती. शेतकरी चळवळीशी प्रामाणिक असलेल्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचेही रविकांत तुपकर म्हणाले होते. शिवाय बुलडाणा विधानसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय घ्यायचा हे २९ ऑक्टोबर पर्यंत ठरवू असे रविकांत तुपकर यांनी दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हटले होते. दरम्यान आता रविकांत तुपकर यांनी बुलढाणा विधानसभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून ४ अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. उद्या,अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २९ ऑक्टोबरला रविकांत तुपकर अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.