माळी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार!आमदार संजय रायमुलकर यांचा शब्द! जानेफळात सकल माळी समाजाचा मेळावा संपन्न..
आज जानेफळ येथे सकल माळी समाज बांधवांचा मेळावा समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यात आमदार रायमुलकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. आपल्या भाषणात संजय रामुलकर पुढे म्हणाले की, मतदार संघातील सर्व गावांमध्ये विकासाची विक्रमी कामे करण्यात आली आहेत, आदर्श मतदारसंघ व्हावा, यासाठी मी नेहमी प्रयत्न केले आहेत.
सर्व घटकांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या विविध विभागाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे.माळी समाजाच्या मागणीनुसार जानेफळ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारण्याचा, माळी समाज भावनांची निर्मिती करण्याचा व नायगाव देशमुख येथील वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याचा माझा प्रयत्न राहील.