Amazon Ad

आम्ही निवडणुकीला तयार! मैदान मारणारच; निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतांनी दंड थोपटले...

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. येत्या दोन - चार दिवसांत महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण २२ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे . दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना निवडणुकीला तयार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे..आमची तयारी पूर्ण झाली आहे, आम्ही तारखांची वाट पाहत होतो..आता मैदान मारणार म्हणजे मारणारच..असे म्हणत बुधवंत यांनी दंड थोपटले आहेत..
बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार आहे, त्यांची केवळ औपचारिक घोषणा २३ नोव्हेंबरला होईल असा आत्मविश्वास बुधवंत यांनी बोलतांना व्यक्त केला. बुलडाणा विधानसभेवर देखील आम्ही निष्ठेचा भगवा फडकविणार आहोत असेही बुधवंत म्हणाले.