पाणीदार काम .. पठ्ठ्या विकासावर ठाम ! खडकपूर्णातून रब्बी हंगामासाठी २५ नोव्हेंबरला सुटणार पाणी! शशिकांत खेडेकरांनीच केला होता पाठपुरावा.
Nov 16, 2024, 17:51 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ पाच वर्ष संधी मिळालेली असताना त्या संधीचं सोनं करत शशिकांत खेडेकर यांनी आमदार आणि त्यांची विकास कामे ही उघड्या डोळ्यांनी दाखवून दिली होती.माजी आमदार असताना सुद्धा शशिकांत खेडेकरांचा पाठपुरावा कधीही कमी पडला नाही. येत्या रब्बी हंगामासाठी खडकपूर्णांतून पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्याचा पाठपुरावा सुद्धा शशिकांत खेडेकर यांनी केला. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी लावून धरलेल्या पाठपुराव्यामुळे आता २५ नोव्हेंबरला खडकपूर्णा प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी कॅनाल द्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शशिकांत खेडेकर यांचं " पाणीदार काम आणि पठ्ठ्या विकासावर ठाम" अशा प्रतिक्रिया शेतकरी बांधवांमधून येत आहेत.
रब्बी हंगामासाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांना अवगत केले होते. निवडणुकीच्या धामधुमितही डॉ. शशिकांत खेडेकर यांनी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून हा विषय मार्गी लावला आहे. आता ,२५ नोव्हेंबरला खडकपूर्णा प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येणार आहे..