ELECTION SPECIAL चिखलीत वृषाली बोंद्रे, मनोज लाहुडकरांनीही भरले अर्ज! ४६ जणांचे ६३ अर्ज दाखल! विनायक सरनाईक, नितीन राजपुतांचाही अर्ज....
चिखलीत भाजपकडून श्वेता महाले, काँग्रेसकडून राहुल बोंद्रे यांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरला. मनसेने देखील यात उडी मनसेकडून गणेश बरबडे यांनी अर्ज भरला. शिवाय राहुल बोंद्रे यांच्या अर्धांगिनी वृषाली बोंद्रे यांनीदेखील अर्ज भरला आहे. राहुल बोंद्रे यांचे सहकारी तथा उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर यांनी देखील अर्ज भरला आहे. रविकांत तुपकर यांचे सहकारी विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी देखील आपले अर्ज दाखल केले आहेत. अर्जात त्रुटी निघाल्यास काय? किंवा वेळेवर काही गडबड झाल्यास काय याची खबरदारी म्हणून राहुल बोंद्रे यांच्याकडून वृषाली बोंद्रे आणि लाहुडकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाई आठवले गटाकडून नरहरी गवई यांनी देखील अर्ज भरला आहे.दरम्यान सध्या ४६ जणांनी आपले अर्ज दाखल केले असले तरी त्यातील काहींनी शपथपत्र अर्जासोबत जोडलेले नाही, ४ ऑक्टोबरच्या आधी शपथपत्र न जोडल्यास असे अर्ज बाद होईल. शिवाय ४ नोव्हेंबर पर्यंत ज्यांनी अर्जातील त्रुटी दूर केली नाही असेही अर्ज बाद होणार आहेत. काही जण स्वतःहून देखील माघार घेतील त्यामुळे मुख्य लढाईत किती उमेदवार शिल्लक राहतात याचे उत्तर ४ नोव्हेंबर नंतर कळणार आहे..