डॉ.ऋतुजाताईला मतांची ओवाळणी देणार! मातरखेड, गायखेड येथील भावांचा निर्धार; गावभेटी दौऱ्यांना मिळतोय दमदार प्रतिसाद...

 
 लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून डॉ.ऋतुजा चव्हाण यांना प्रचंड प्रतिसाद गावोगावी मिळतो आहे. ही लढत आता निर्णायक टप्प्यावर आली असून आ. रायमुलकर यांच्याशी हि थेट लढत होणार आहे. मतदारसंघातील एकंदरीत चित्र सध्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्यासाठी अनुकूल दिसत आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावोगावी डॉ.ऋतुजा चव्हाण भेटीगाठींसाठी जात असून आता आम्ही ऋतुजाताईला मतांची ओवाळणी देणार असल्याच्या भावना अनेक "भाऊ" व्यक्त करतांना दिसत आहे...
मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने डॉ.ऋतुजा चव्हाण यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर संबंध मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. त्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पाठीब्यांने ऋतुजा चव्हाण यांची ताकद दहापटीने वाढली आहे. तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बरोबरीची मते घेतली होती. त्यामुळे तुपकरांना मानणारा मोठा वर्ग डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या सोबत असल्याने ही लढत रंगतदार होणार आहे. आमदार संजय रायमुलकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार बाहेरचा असल्याने डॉ.ऋतुजा चव्हाण याच रायमुलकर यांच्या विरोधात सक्षम पर्याय ठरू शकतात असा सूर आता मतदार संघात उमटू लागला आहे. दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या गाठीभेटींमध्ये सुद्धा डॉ. ऋतुजा चव्हाण यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. काल, मातरखेड, गायखेड, लोणार भागात डॉ.ऋतुजा चव्हाण यांचा दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात शेकडो तरुणांनी आम्ही आमच्या ऋतुजा ताईंना मतांची ओवाळणी देऊ असा शब्द दिला आहे...