पत्रकारांसाठी अनोखी स्पर्धा व्हाईस ऑफ मीडियाचे आयोजन ; ओळखा कोण होणार आमदार अन् जिंका लाखोंची बक्षीसे....
Updated: Nov 22, 2024, 14:48 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये कोण आमदार होणार या विषयावर ही स्पर्धा असेल. बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
स्पर्धेचे स्वरूप असे आहे..
पत्रकारांनी एका कोऱ्या कागदावर आपले नाव, वृत्तपत्राचे नाव लिहावे. त्याखाली बुलढाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, सिंदखेड राजा व मेहकर अशा सात मतदारसंघांची अनुक्रमे एकाखाली एक नावे लिहायची व प्रत्येक मतदारसंघाच्या नावासमोर कोण निवडून येईल हा अंदाज व्यक्त करायचा. ही माहिती पूर्णपणे गुप्त ठेवावी व संघटनेच्या वतीने ही गुप्त ठेवण्यात येईल. एका सीलबंद पाकिटामध्ये ही माहिती भरून पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी 22 नोव्हेंबरला रात्री ९ पर्यंत पोहोचवावे. व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्यालयीन सचिव राहुल रिंढे, संपर्क क्रमांक:8411027002 यांच्याकडे आपला सीलबंद लिफाफा पोहचवावा.
बक्षीसांचे स्वरूप
प्रथम बक्षीस ७ पैकी ७ बरोबर अंदाज वर्तवणाऱ्यास १ लाख ११ रुपये,द्वितीय बक्षीस ७ पैकी ६ बरोबर अंदाज वर्तवणाऱ्यास ५१ हजार रुपये व
तृतीय बक्षीस ७ पैकी ५ बरोबर अंदाज वर्तवणाऱ्यास ३१ हजार रुपये असे बक्षीसांचे स्वरूप राहणार आहे. एकापेक्षा जास्त विजेते ठरल्यास बक्षीसाची रक्कम विभागून देण्यात येईल. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुलढाणा येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे...