सिंदखेडराजात व्हायरल पत्रामुळे खळबळ! डॉ.शशिकांत खेडेकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र खरे की खोटे?स्थानिक नेत्यांना कल्पना नाही! वरिष्ठ पातळीवरून खुलासा आवश्यक;

मनोज कायंदे यांच्याकडून व्हायरल पत्र खोटे असल्याचा दावा.....

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. दरम्यान आज सकाळपासून डॉ.शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या नावाने व्हायरल होत आहे. दरम्यान हे पत्र खरे की खोटे याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवावादीच्या स्थानिक नेत्यांना याबाबतब अद्याप कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून यावर खुलासा अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान सिंदखेडराजा मतदारसंघाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कायंदे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्धीस देऊन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने खोटे पत्र प्रसिद्धीस दिल्याचे म्हटले आहे. माय बाप जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, विजय आपलाच होणार आहे असा विश्वासही मनोज कायंदे यांनी व्यक्त केला आहे...
अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केलेला खुलासा...👇
मनोज