विजयराज शिंदें मुंबईदरबारी! सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; आ.गायकवाडांच्या तक्रारींचा पाढा वाचला; मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली...
Oct 30, 2024, 19:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेते विजयराज शिंदे यांनी काल बुलडाणा विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली असताना विजयराज शिंदे यांनी बंडखोरी केली..याला प्रत्युत्तर म्हणून आ.गायकवाड यांनी त्यांचा मुलगा कुणाला गायकवाड यांना चिखलीत उमेदवारी अर्ज भरायला लावला..दरम्यान आता विजयराज शिंदे यांनी मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आ.गायकवाड यांच्या शेकडो तक्रारी यावेळी विजयराज शिंदे यांनी फडणवीस यांच्या कानावर टाकल्या. आपला उमेदवार पाहिजे अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या असेही शिंदेंनी फडणवीसांना सांगितले...
देवेंद्र फडणवीस यांनी आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे विजयराज शिंदे यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले. उद्या सकाळी भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेणार असल्याचे विजयराज शिंदे म्हणाले..त्यामुळे विजयराज शिंदे आपला अर्ज मागे घेतात की कायम ठेवतात..भाजप नेतृत्व विजयराज शिंदे यांना काय सूचना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...