Update : 22 सरपंचपदांचा 19 मार्चला फैसला!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या 22 ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्याची दीर्घ व डोकेदुखी ठरलेली प्रतीक्षा 4 मार्चला अर्धीअधिक संपली होती. आता 19 मार्चच्या मुहूर्तावर या प्रतीक्षेचा सोक्षमोक्ष अर्थात सरपंचाची प्रत्यक्ष निवड होणार आहे. यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 22 ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय! प्रारंभी काढण्यात आलेल्या …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या 22 ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्याची दीर्घ व डोकेदुखी ठरलेली प्रतीक्षा 4  मार्चला अर्धीअधिक संपली होती. आता 19 मार्चच्‍या मुहूर्तावर या प्रतीक्षेचा सोक्षमोक्ष अर्थात सरपंचाची प्रत्यक्ष निवड होणार आहे. यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 22 ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय!

प्रारंभी काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे तेथील सरपंचपदाची निवडणूक रखडली होती. या ठिकाणचे सरपंच पदाचे आरक्षण  4 मार्चला नव्याने काढण्यात  आले. जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका  15 जानेवारीला पार पडल्यानंतर 18 जानेवारीला निकाल लागून सदस्य ठरले. यानंतर 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान   कमीअधिक 493 ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले, त्यांनी थाटात कारभार स्वीकारून कामकाजदेखील सुरू केले. मात्र काही ठिकाणी सरपंच पदाचा फैसला अगोदर काढलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नाही. अशा प्रलंबित सरपंच पदाची निवडणूक 19 मार्चला दुपारच्या रणरणत्या उन्हात पार पडणार आहे.   यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून संबंधित तहसीलदारांची जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायती

  • नांदुरा तालुका ः जवळा बाजार, माळेगाव गौड, अलमपूर
  • मोताळा तालुका ः पुन्हई , कोथळी ,अंतरी , टाकळी वाघजल
  • संग्रामपूर तालुका ः वरवट खंडेराव, पातुर्डा खुर्द, रुधाना, तामगाव, आलेवाडी
  • मेहकर तालुका ः आरेगाव ( मेहकर)
  • मलकापूर तालुका ः वरखेड
  • चिखली तालुका ः भोगावती, दिवठाणा
  • बुलडाणा तालुका ः आडोळ बुद्रुक, वडशिंगी ( जळगाव), अजीसपूर
  • सिंदखेड राजा ः पिंपरखेड
  • लोणार तालुका ः गोत्रा
  • खामगाव तालुका ः गवंडाळा