जयश्रीताईंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची तोफ उद्या बुलडाण्यात धडाडणार! सभेची तयारी अंतिम टप्प्यात; पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन; बुलडाण्याच्या सभेकडे राज्याचे लक्ष..
शिवसेना पक्षफुटी नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा बुलडाणा शहरात सभा घेणार आहेत. गतकाळात आमदार संजय गायकवाड यांच्याकडून शिवसेनेवर झालेला शाब्दिक हल्ला, वेगवेगळी विधाने यामुळे उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संजय गायकवाड यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना जिद्दीला पेटली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या प्रचारही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे.त्यामुळे उद्याची सभा सुपरहिट करण्याकडे महाविकास आघाडीचा जोर राहणार आहे..दरम्यान आज जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सभास्थळाची पाहणी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना आणि बंदोबस्ताची नियोजनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी केले आहे...