धावपळीतही उद्धव ठाकरेंनी राहुल बोंद्रेंसाठी काढला वेळ! प्रचार कार्यालयाला दिली भेट; कार्यकर्त्यांशी संवादही साधला! महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन..
Nov 9, 2024, 08:11 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल ,८ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बुलडाणा आणि लोणार येथे त्यांच्या पूर्वनियोजित सभा होत्या. मात्र या पूर्वनियोजित कार्यक्रमात नसतांना सुद्धा आणि आधीच उशीर झालेला असताना देखील उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्यासाठी देखील वेळ काढला. बुलडाणा येथील सभा आटोपून उद्घव ठाकरे यांनी चिखली येथील राहुल बोंद्रे यांच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत महाविकास आघाडीला बळ देण्याचे आवाहन केले.
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला विदर्भातून सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र विदर्भाच्या वाट्याला काय आली असा सवाल त्यांनी केला? रोजगार आले का.. सगळे रोजगार आणि व्यवसाय त्यांनी गुजरातला पळवले आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही .मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे हक्क वहीत राखणे हे माझ्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील असे उद्धव ठाकरे म्हणाले.